शनिवार, १८ जानेवारीला संध्याकाळ नंतर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्र ती बातमी ऐकून हादरून जावं, असंच काहीसं झालं.
‘कोकणकड्याच्या मध्य भागून ट्रॅव्हर्स मारताना भवानी धारेकडून उजवीकडे ( शेंडी सुळक्याकडे जाताना) अरुण सावंत सर मिसिंग आहेत”. सर्व रेस्क्यू टीम्समध्ये बोलणी चालू झाली आणि अतिशय योग्य संपर्क ठेऊन सर्व टीम्सने जोमाने कामाला सुरवात केली.
‘कोकण कडा म्हणजेच दुसरं नाव देता येईल रौद्र कडा’, अश्या ठिकाणी जाणं म्हणजे टीमसुद्धा तगडीच असावी आणि मदत करणारे प्रत्येक जण तिथे महत्वाचेच,
प्रत्यक्ष ठिकाणी असलेलया जाणकार माणसाशी बोलणं करून पुढचं नियोजन सर्वच टीमने मिळून केलं.
(सगळ्यात महत्वाची गोष्ट जो पर्यंत एकदम निश्चित बातमी कळत नाही, तो पर्यंत आशेचे किरण जागेच ठेवले पाहीजेत, कोणत्याही निर्णयावर येणं चुकीचं ठरेल).

टीम १
निसर्ग मित्र,पनवेल
( विश्वेश महाजन,आप्पा,पराग सरोदे,हेमंत वैद्य,निखिल पाटील,सचिन शिंदे ).
शैलभ्रमर, मुंबई ( हितेंद्र मोरे उर्फ गोटू ),
भ्रमंती, मुंबई( कैवल्य वर्मा ),
Petzl ( किशोर चव्हाण ),
गिरिप्रेमी ( क्रीष्णा ढोकळे ),
गिरीविराज ( प्रदीप म्हात्रे, दिवाकर दादा, किशोर मोरे ) आणि अजून काही जण,
ही टीम खिरेश्वर मार्गे शेंडी सुळक्याकडे जाणार ( यात साबळे मामा आणि दीपक तिथे राहणारा यांची खूप चांगली साथ मिळाली),
आप्पा खिरेश्वर मधून किंवा मागून काही मदत लागली तर, म्हणून त्यासाठी थांबले,

टीम २
शिवदुर्ग, लोणावळा ( गणेश गिध, रोहित वर्तक, तुहीन सातारकर, भुपेश पाटील ).
पाचनई गावातील ( भास्कर हा सुद्धा मदतीसाठी गावातल्या काही जणांना घेऊन शिवदुर्ग सोबत आला होता ).
ही टीम पाचनई मधून नळीच्या वाटेने उतरून कोकणकडा खालच्या बाजूने ट्रॅव्हर्स मारून येणार.
ओंकार ओक आणि सुनील गायकवाड, यश जगे हे बैलपाडा गावात बाकीच्या गोष्टी सांभाळत होते.

सर्व टीम कामाला लागल्या, टीम १ रविवारी लवकर सकाळी शेंडी जवळ पोहोचली, तिथे असलेल्या २९ जणांना शेंडी सुळक्याच्या इथे आणायला सुरवात केली ( सर्व जण सुखरूप होते).
त्यांचा मार्ग शेवटपर्यंत अँकर करून, ठरलेल्या पुढच्या महत्वाच्या सर्च ऑपरेशनसाठी गोटू, विश्वेश, दिवाकर, प्रदीप, पराग मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढे निघालो, अंदाज लावल्या प्रमाणे ट्रॅव्हर्स मारुन गोटू आणि आणि मी अंदाजे ३५० फूट रॅपलिंग केलं, आणि लगेचच जिथे शक्यता वाटत होती तिथे ( भवानी धारेकडे बघताना उजवीकडे ) आम्हाला रविवार सकाळी साडे अकरा वाजता बॉडी लोकेट झाली.

मागोमाग मदतीसाठी दिवाकर आणि पराग रॅपलिंग करून पोहोचले, आणि आम्ही आमची टीम २ आमच्या पर्यंत पोहोचण्याची वाट बघत होतो.
कोकणकडा आणि त्यात तिथून एखादं असं काम करणं म्हणजे जोखमीचे आणि कष्टाची परिसीमा ओलांडणारच. ( स्वतः अरुण सरांनी १९८६ मध्ये पुढाकार घेऊन त्यावेळी एक कठीण असं रेस्क्यू ऑपरेशन कोकणकड्यामध्ये केलं होतं).

टीम २ आमच्या पर्यंत पोहोचताच, पुढच्या कामाला सुरवात केली. गणेश, तुहीन, भुपेश, रोहित, विश्वेश, गोटू, दिवाकर, पराग आणि बाकीचे मदतीला तिथे होतेच, आम्ही सर्वांनी ऍक्सीडेन्ट लोकेशन ते कोकणकडा बेस ते जवळ जवळ पन्नास टक्के मोरेन ( दगडांची मोठी घळ ) असं टप्या टप्यात जीप लाईन सेट अप करून काम केलं, आणि नंतर गावापर्यंत ‘सर्वांच्या मदतीने’ स्ट्रेचरवर उचलून सर्वांनी काम केलं. आणि शेंडी सुळक्या जवळील टीम कैवल्य वर्मा, किशोर मोरे, किशोर चव्हाण, प्रदीप म्हात्रे, हेमंत वैद्य, निखिल पाटील, सचिन शिंदे आणि अजून काहीजण तिथलं काम संपवून, वाइंड अप करून खिरेश्वरला उतरली.

‘यात आम्ही सोडून अनेक जणांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत झालीच आहे, काही ट्रेकर्सने ट्रेक करत पाणी आणि खाणं तर आणलंच आणि गावापर्यंत स्ट्रेचर उचलून घेण्यास मदत केली, भास्कर आणि कमळू यांचे आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि त्यांच्या सोबत आलेल्या गावकऱ्यांचे ज्यांनी मदत केली, आणि कसलीच अपेक्षा न ठेवता नंतर कमळूने प्रेमाने जेऊ घातलेल्या डाळ-भात-भाजी यासाठी सुद्धा तुम्हाला शतशः प्रणाम ).

‘सूरज मालुसरे तू अश्या परिस्थितीत सुद्धा त्या ठिकणी मदत पोहोचे पर्यंत धीराने गोष्ट हाताळलीस आणि सोबत असलेल्यांना सांभाळलं’. 🙏

‘हे असंच्या अस घडलेलं आहे.’

‘सह्याद्री तितुका मेळवावा, गिर्यारोहण धर्म वाढवावा.’

विश्वेश महाजन, निसर्ग मित्र, पनवेल

Found useful? Share it with everyone.

4 Replies to “अनाकलनिय आणि अनपेक्षित”

  1. खूप छान Reporting. असे तपशील इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात! धन्यवाद!

  2. Very nicely put. Khup sundar Ani detailed mahiti dili. Avdha kathin rescue operation, yogya velet khup changla ritine paar padlay. Kudosnto the all the team members and supporters for pulling this difficult operation

  3. सर्वच सह्यवीरांचे कौतुक नि आभार.
    अरूण सरांचं जाणं मात्र अनाकलनीय व अजूनही विश्वास न बसणारं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *