- This event has passed.
MAC Samwad Jan’20
January 23, 2020 @ 6:00 pm - 9:00 pm
Freeहजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवलेलया महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. कोणी साहस म्हणून तर कोणी पर्यटन म्हणून, कोणी सहल म्हणून तर कोणी अभ्यासूवृत्तीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या या गडकिल्ल्यांना भेट देत असतात. गडांना भेट देण्याची कारणे वेगवेगळी असली तरी या गडकिल्ल्यांना भेट देताना त्यांचे पावित्र्य राखणे, महत्त्वाचे असते. याच विषयावर गडभ्रमंती करण्याऱ्या तुमच्या सर्वांचे मत समजून घेता यावे, त्यावर चर्चा व्हावी म्हणून यंदाच्या ‘मॅक संवाद’चा विषय ‘दुर्गभ्रमंती आणि शुचिता’ असा घेण्यात आला आहे. इतिहास अभ्यासक डॉ. मिलिंद पराडकर या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ‘मॅक संवाद’चा हा दुसरा भाग असून तो १० जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे.
१० जानेवारीच्या मॅक संवादमध्ये पुढील विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात येईल.
१. दुर्गभ्रमंती आणि शुचिता – डॉ मिलिंद पराडकर
२. महा ऍडव्हेंचर काउन्सिलचे सुरू असलेले काम
३. महा ऍडव्हेंचर काउन्सिलची नोंदणी