ट्रेकिंग करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राजगड येथे गेलेल्या वाळवा इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष विकास बिरदेव गावडे (वय ४८) यांचे आज सकाळी आकाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सामाजिक, सहकार आणि विविध क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या विकास गावडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरावर शोककळा पसरली.
विकास गावडे इंजिनिअर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष होते. गुरुवारी या संघटनेची बैठक झाली होती आणि शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास संघटनेचे सर्व सदस्य मिळून ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग दरम्यान साडेदहाच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि यातच अचानक त्यांना हृदयविकाराचा शतक आल्याने त्यांचे निधन झाले. उपचाराला नेण्यापूर्वीच ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. विकास गावडे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड इंजिनिअर होते. तालुका अभियंता संघटना तसेच क्रेडाई व जायंट्स ग्रुप, आसमंत फाउंडेशनमध्येही सक्रिय होते. वडील बिरदेव गावडे यांच्या नावाने त्यांनी पेठ (ता. वाळवा) या त्यांच्या मूळ गावी पटसंथा स्थापन केली होती. ते शेती आणि पोल्ट्रीचाही व्यवसाय करत होते. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
सौजन्य: इ सकाळ