माऊंट किलीमांजारो: गिर्यारोहक शिलेदार सागर विजय नलवडे यांनी मोहिम सह्याद्रीच्या लेकराची या मोहीमेअंतर्गत जगातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेले आफ्रिका खंडातील सर्वात उंच ५८९५ मीटर उंचीचे शिखर माऊंट किलीमांजारो सर केले आहे. ऊणे १५ ते २० तापमान शिखरावर असताना आणि बर्फवृष्टि होत असतानाही ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी ७१ फूट तिरंगा फडकवला. भारतीय संविधान, स्वराज्याची राजधानी रायगडावरील माती, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या शिखरावर नेऊन त्यांनी महाराजांना आणि सर्व भारतीयांना अभिवादन केले.

हा नवा विक्रम शिलेदार अॅडव्हेंचर इंडियाकडून प्रस्थापित केला आहे. शिलेदार सागर यांच्यासोबत अर्नाळा, वसई येथील रोहित पाटिल, इंदापुर येथील योगेश करे, आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस जवान आशिष दिक्षित हे या मोहिमेत सहभागी झाले होते. ३६० एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर श्री आनंद बनसोडे यांचे या मोहिमेसाठी सहकार्य लाभले.

मला पुढील पाच खंडातील पाच शिखरे सर करायची आहे. पण या हिमशिखराच्या मोहिमा खुप खर्चिक व अवघड आहेत त्या मोहिमा करणे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला खुप आव्हानात्मक आहे. पण या मोहिमाची मी जिद्दीने तयारी करत असुन महाराष्ट्रातील सर्वांचे मला सहकार्य लाभत आहे. मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती याचे बहुमोल मार्गदर्शन आणि मदत मिळाली असून या मोहिमेसाठी कागलचे राजे समरजितसिह राजे आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी आणि महाराष्ट्रातील सर्व सह्याद्रि मित्रांनी बहुमोल असे आर्थिक सहकार्य केल्याचे गिर्यारोहक शिलेदार सागर विजय नलवडे यांनी सांगितले.

सौजन्य: माझा पेपर

Found useful? Share it with everyone.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *