नागफणी सुळका गाठणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या

नाशिक येथील गरूडझेप प्रतिष्ठानच्या सदस्या दृष्टीहीन गिर्यारोहक नेहा पावसकर यांनी नागफणी सुळका व कोकणकडा येथे चढाई करून, तेथील दोन अतिखोल दऱ्या पार करीत दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. विशेष म्हणजे असा विक्रम नोंदविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, त्यांची ही साहसपूर्ण कामगिरी दिव्यांग व्यक्तींसोबतच सामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

मुंबईच्या नेहा पावसकर यांना वंडर बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड या लंडनच्या संस्थेतर्फे गरूडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांच्या हस्ते दोन जागतिक विक्रमांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी नेहा पावसकर यांनी लोणावळा येथील नागफणी सुळक्यापर्यंत चढाई केली, त्यानंतर मध्यापर्यंत येवून ३५०० फूट खोलीची दरी पार केली, हा विक्रम करणाNया त्या पहिल्या महिला ठरल्या, तर हरिश्चंद्र गडाच्या कोकणकडा येथील आशिया खंडातील सर्वात खोल ४६०० फुटाची दरी देखील त्यांनी यशस्वीरित्या पार केली. हे दोन्ही विक्रम नोंदवल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याआधी त्यांना विविध साहसपूर्ण कामगिरीसाठी शिवछत्रपती पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

सौजन्य: सामना

Found useful? Share it with everyone.

One Reply to “दृष्टीहीन गिर्यारोहक नेहा पावसकर यांच्या नावे दोन जागतिक विक्रम”

  1. अभिनंदनीय कामगिरी केली आहे आम्हाला आमच्या या ताईंचं कौतुक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *